मुंबई, दि 8 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 9 नोव्हेंबर 2022, गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे महत्त्व, या मंडळाचे रोजगार निर्मितीतील योगदान, केंद्र […]
Author: Lokrath Team
लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३९७३ पशूंची नुकसान भरपाई पशूपालकांच्या खात्यावर जमा
मुंबई, दि. ८: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 3973 पशूंच्या नुकसान भरपाईची 10.23 कोटी इतकी रक्कम पशूपालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री सिंह म्हणाले, “राज्यामध्ये दि. 8 नोव्हेंबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3428 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण […]
राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांचे आवाहन मुंबई दि. ८, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी केले. मुंबई जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व […]
गुरु नानक यांचे कार्य प्रेरणादायी- उपमुख्यमंत्री
मुंबई दि. 8: “समाज, देश, संस्कृती, धर्म वाचवण्यासाठी गुरू नानक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लढा दिला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांचा इतिहास अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. गुरुनानक जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित प्रकाशपूरब कार्यक्रमात ते बोलत होते. “गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त व प्रकाश पावन पर्व वर्षानिमित्ताने मला गुरू ग्रंथसाहेब यांचे दर्शन व […]
अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबई, दि. ८ : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या वैचारिक आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री. चपळगावकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी […]
गुरूनानकजींच्या मानव कल्याणाच्या विचारांमुळे शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान- मुख्यमंत्री
मुंबई, दि. ८: श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. श्री गुरुनानक जयंती निमित्त येथील श्री गुरुसिंग सभेच्या माध्यमातून वडाळा येथे आयोजित केलेल्या गुरूबानी पाठ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. […]
शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल घोषित
मुंबई, दि 8 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायं. 6.00 वाजता www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित […]
रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ८: राज्यातील उद्योग, कारखाने, खाजगी आस्थापना, कॉर्पोरेट संस्था यामधील रोजगार भरतीसाठी कौशल्य विकास विभागामार्फत वेळोवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून विभागीय तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक मेळाव्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात […]
महाराष्ट्र आणि देश यापलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी स्पर्धेची दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र होणार
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची गोवा येथे घोषणा मुंबई, दि 8 :- महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील,अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 59 व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ […]
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2021
Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Bharti 2021, (Maharashtra Police Recruitment 2021) for 18331 Police Constable & Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra. Total: 18331 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई 14956 […]