ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.२९ : गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज  सांगितले. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन ! मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्री. माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या समितीच्या सदस्यपदी ॲड.राम आपटे, दिनेश ओऊळकर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय

पुढील हंगामापासून डिजिटल वजन काटे सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. 29 : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बालकांच्या लसीकरणावर भर द्यावा – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा मुंबई, दि. 29 : गोवर संसर्ग आढळणाऱ्या भागात नियमित लसीकरणाबरोबरच अतिरिक्त लसीकरणही केले जावे. बालकांच्या लसीकरणावर भर देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थीनींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्धतेबाबत सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. 29 : सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मुलींच्या वसतिगृहासाठी सोलापूर येथे जागा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत शिष्टमंडळ, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मंत्रालयातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शैक्षणिक संस्थांनी आदर्श विद्यार्थी घडवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वयंअर्थसहाय्यित शाळांना इरादा आणि मान्यता पत्रे प्रदान मुंबई, दि. 29 :- विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. शैक्षणिक संस्थांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक संस्थांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान शाळांच्या दर्जावाढीसाठी इरादा पत्रे आणि मान्यता पत्रे प्रदान केली जात आहेत, हा पारदर्शक पायंडा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती द्यावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. २९ : पाटण तालुक्यातील काळोली येथे बाळासाहेब देसाई अद्ययावत बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामकाजाला गती द्यावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. आज मंत्रालयात पाटण तालुक्यातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २९ : “भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने आहेत. सांस्कृतिक देवाणघेवाण भारत रशिया संबंधाला पूरक आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. रशिया-भारत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन

महाराष्ट्रात ‘सिनार्मस’ची दोन टप्प्यात २० हजार कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. इंडोनेशियास्थित मे. सिनार्मस पल्प ॲण्ड पेपर कंपनीला आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील धेरंड येथे २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार मुंबई, दि. २९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल […]