ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र शासन

१) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणार: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती २०२२-२३

महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पद भरती २०२२-२३ – Maharashtra Talathi Bharti 2022: खालील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लिपिक टंकलेखन पदाची सर्वात मोठी भरती होणार, आयोगाने दिली माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एमपीएससीने 1 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ब्रेकींग: शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..

 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असतो. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा या ऋतूंमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी! अशा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासन देखील वेळोवेळी मदत करण्यासाठी पाऊले उचलून आर्थिक मदत देत आहे. आता यासंबंधी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे.  कृषिमंत्री अब्दुल […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 28 : यंदाच्या 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळ्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याची सुरूवात 14 नोव्हेंबरपासून  झाली होती. याचा समारोप रविवारी 27 नोव्हेंबरला झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला  पुरस्कार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018 आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ तर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलुंड आयटीआय येथे मंगळवारपासून तंत्रप्रदर्शन

मुंबई, दि. 28 : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर आधारित वस्तू व मॉडेलचे तंत्रप्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  हे प्रदर्शन शालेय विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.00 या वेळेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 28 : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अभियंत्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 28 : देशाच्या तसेच राज्याच्या विकासात अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय सेवेतील त्यांच्या सेवा नियम, भरती, पदोन्नती या मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल. अभियंत्यांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सर्वांनी मिळून मुंबईचा विकास करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२३-२४ च्या ४५० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी मुंबई, दि. 28 :- मुंबई शहर जिल्ह्याच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) 450 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2022-23 च्या 315 कोटींच्या तुलनेत यावर्षीच्या आराखड्यात 135 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालकमंत्री […]