मुंबई, दि. 28 : मुंबई हे जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर व्हावे म्हणून भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी […]
महाराष्ट्र
विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 28 : राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे; जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास […]
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी […]
महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई, दि.28 – महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या या भव्य तैलचित्रांचे अनावरण करून […]
उस्मानाबाद जिल्हा समृध्द आणि निरोगी असावा हा शासनाचा मानस – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
परंडा येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद,दि.27(जिमाका) :- उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हे सर्वं रोगाचे निदान एकाच ठिकाणी व्हावे म्हणून या महाआरोग्य शिबिरात देश विदेशातील मोठे डॉक्टर्स उपस्थित आहेत. प्राथमिक स्वरुपांच्या चाचण्या या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर प्राथमिक उपचार आणि औषध याच ठिकाणी दिली जात आहेत. जर काही गंभीर आजार असतील त्यांच्या सर्व चाचण्या व सर्व परीक्षणे […]
शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
ॲग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनात वनमंत्र्यांचे मार्गदर्शन नागपूर दि.२७ : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला वाव आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये ही बाब शक्य आहे. बांबू संदर्भातील नवनवीन संशोधन सुरू असून शास्त्रशुद्ध बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी कल्पवृक्ष सिद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री तथा नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात ॲग्रोव्हीजन हे मध्यभारतातील […]
नंदुरबार जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई, दि. २७ : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत. या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक […]
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
पर्यटकांना मिळणार १६० वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा […]
विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
मृद्गंध पुरस्कारांचे वितरण मुंबई, दि. 26 : शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाही, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 12 व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार आशीष शेलार, […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
मुंबई, दि. २६ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २५.३१ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 26.11.2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3775 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 309064 बाधित […]