महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील. दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या […]
मुंबई
पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालय आणि विधीमंडळ […]
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत औद्योगिक वापरासाठीचे चार बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्ताव मंजुरीस्तव सादर
राज्यातील घरगुती व औद्योगिक पातळीवर पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, बिगर सिंचन पाणी आरक्षणासाठी सादर करण्यात आलेल्या चार प्रस्तावांबाबत आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदि उपस्थित होते. प्रचलित क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार – पिण्याच्या पाण्यासाठी १५ […]
अनुकंपा प्रकरणाची 224 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार
जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन 2024 व दिनांक 01.01.2025 पर्यत पुर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करुन गृहचौकशी अहवालाच्या अधिन राहुन पुर्ण माहिती असलेल्या एकूण 224 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या http://gadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच […]
आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत 450 जोडप्यांना २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय
गडचिरोली, दि. 8 : समाजातील जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलनासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी 50,000 याप्रमाणे एकूण २ कोटी २५ हजारांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्ट समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हे असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या […]
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून आरोग्य विषयक योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळेल आणि त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम […]
ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज रस्त्यांचे भूमिपूजन गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या. जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी ते जिल्हा हद्द या ३ कोटी ४६ लक्ष २० हजार रुपये किंमतीच्या आणि वंजारवाडी-तित्रंज ते जिल्हा हद्द या २ कोटी १६ लक्ष […]
शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रेशीम कोष खरेदी विक्री […]
‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकासाला अधिक चालना देता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री […]
उद्योग विभागाची १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल – उद्योग मंत्री उदय सामंत
१०० दिवसांच्या कामकाज आराखड्यासंदर्भात बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवस आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता होण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी […]