ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाचा निधी इत्यादींबाबत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, 13 मार्च महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य योजनांचा गावोगावी प्रचार

गडचिरोली दि.१२: जिल्ह्यात विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मल्टीमीडिया चित्ररथाद्वारे जनकल्याण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हिरवी झेंडी दाखवून या मल्टीमीडिया चित्ररथाला रवाना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, संजय गांधी योजनेचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक मान्यवर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींचा निधी मंजूर

गडचिरोली दि. 12 : जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनी नुकत्याच झालेल्या गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

समाजकल्याण योजनांच्या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली दि.१२: – सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समाजकल्याण योजनांच्या मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला बसस्थानक, पंचायत समिती, तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली. शासनाच्या कल्याणकारी योजनांबद्दल नागरिकांमध्ये […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग २ जमिनींवर कर्ज मिळण्यासंबंधीचे परिपत्रक पुन्हा निर्गमित करणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकाची माहिती बँकांना द्यावी मुंबई, दि. ११ – शेतकऱ्यांना विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर तारण म्हणून भोगावटा वर्ग दोनमधील जमीनी बँका, वित्तीय संस्थांकडे तारण ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक यापूर्वीच निर्गमित करण्यात आले आहे. यासंबंधी वित्तीय संस्थांना माहिती व्हावी व शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुलभता यावी यासाठी हे परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात येणार आहे. तसेच याची माहिती सर्व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

लाडक्या भावांना ५ महिन्यांची मुदतवाढ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या कालावधीस पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याची विधानसभेत घोषणा केली. त्यामुळे नाशिक महापालिकेत कार्यरत असलेल्या जवळपास २५० लाडक्या भावांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या धर्तीवर लाडक्या भावांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ आणली होती. सहा महिन्यांसाठी युवकांना […]

गडचिरोली महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अजित पवारांनी मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, ‘या’ आहेत 13 मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून, माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले. यापूर्वी शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा, जयंत पाटील यांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदे 9 वेळा अर्थसंकल्प सादर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प, शेषराव वानखेडेंचा ‘तो’ विक्रम मोडणार

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (दि. 10 मार्च 2025) राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. शेषराव वानखेडेंनंतर अजित पवार सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून चॅम्पियन्स चषक विजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन आयसीसी चॅम्पियन्स चषकावर तब्बल १२ वर्षांनंतर भारताचे नाव कोरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने सांघिक भावना आणि जिद्द, चिकाटीतून क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय, अविस्मरणीय आनंदाची पर्वणी आणली आहे, हे अभिमानास्पद आहे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार […]