🌟 सुवर्णसंधी! 🌟 लोकरथ न्यूज पोर्टलच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची इच्छुकांसाठी एक उत्तम संधी! लोकरथ न्यूज पोर्टलसाठी तालुका प्रतिनिधी व शहर प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील स्थानिक बातम्या, सामाजिक घडामोडी, शासकीय योजना, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि महत्त्वाच्या घटना यांना आपल्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देण्याची ही संधी आहे. 📢 पदे: – तालुका […]
राज्य
भामरागडमधील पूरबाधित ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
भामरागड तालुक्यात जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या ५०० पूरबाधित कुटुंबांना दि. २१ ऑगस्ट रोजी खासगी संस्थेमार्फत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. अतिवृष्टीमुळे भामरागड येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी वस्तीत शिरल्याने […]
गडचिरोली पोलीसांची अवैध दारु व्यवसायाविरोधात कठोर कारवाई
पोमकें येलचील हद्दीत चार विविध ठिकाणावरील कारवाईत अवैध मोहफुलाची हातभट्टी नष्ट करत एकूण 5,40,000/- रुपयांचा मुद्देमाल नष्ट गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व साठवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री व साठवणूक करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन […]
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने घरफोडी व जबरी चोरीच्या 02 विविध गुन्ह्रांमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन दागिणे फिर्यादींना सुपुर्द
पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे हस्ते एकूण 10,96,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल सुपूर्द सविस्तर वृत्त असे आहे की, पोस्टे गडचिरोली येथे दाखल असलेल्या घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्रांमध्ये कौशल्यपूर्ण तपास करण्यात येऊन सदर गुन्ह्रातील मुद्देमालाचा शोध पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाकडून घेण्यात आला आहे. पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने मालमत्तेविरुद्धच्या दोन गंभीर चोरीच्या गुन्ह्यांचा […]
सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील निस्वार्थ नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली मुंबई, दि. १८: महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे निस्वार्थ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. सप्तर्षी समाजाला दिशा देणारे विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी चळवळीचे प्रेरणास्थान होते. […]
मंत्र्यांच्या दालनांचं वाटप करण्यात आलं आहे, मंत्रालयात कोण कुठे बसणार
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला पार पडला. तर खातेवाटप २१ डिसेंबरला पार पडलं. २१ डिसेंबरला अधिवेशनही संपलं आहे. आता सगळ्या मंत्र्यांना दालनांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्रालयात कुणाला कुठलं दालन असेल ते आपण जाणून घेऊ. कॅबिनेट मंत्री कुणाला कुठली दालनं, कशी आहे विभागणी? १) चंद्रशेखर बावनकुळे – दालन […]
‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य दलातर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन; राज्यपालांचे हुतात्म्यांना अभिवादन मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 54 व्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे आयोजित ही […]
मधुकरराव पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ६: ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात ते म्हणतात की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व […]
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप
गडचिरोली दि ३: ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या […]
वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन […]










