जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना By Guest -नोव्हेंबर 21, 2026 मुंबई, दि.२१: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. […]
ताज्या घडामोडी
ओबीसी विभागामार्फत भटके-विमुक्तांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अभियानाची केंद्रीय स्तरावर दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभियानाचे कौतुक
पहिल्या टप्प्यात सुमारे ७६ हजार शासकीय कागदपत्रांचे वितरण मुंबई, दि.२१: भटके-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळवून देऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियान आणि तृतीयपंथीयांसाठी राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय या उपक्रमांची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना […]
नागरिकांचे प्रश्न सुटले तरच महसूल सुधारणांना यश – महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे
मुंबई, दि. २० : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशासकीय सुधारणा आणि नागरिकाभिमुख योजनांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविण्यावर भर द्यावा. मंत्रिमंडळाचे निर्णय, नवीन पोर्टल किंवा कायद्यातील बदल ही सुधारणांची सुरुवात असते. या निर्णयांमुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांचे प्रश्न सुटले, तरच महसूल सुधारणांना खऱ्या अर्थाने यश मिळते, असे महसूल विभागाचे […]
दुष्काळ निवारणासाठी शासन कटिबद्ध; निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
नांदेड, दि. २०: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे. सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी […]
मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला महानगर क्षेत्रांतील पाणी नियोजनाचा आढावा
धरण प्रकल्पांसह सांडपाणी पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण आणि पर्यायी स्रोतांवर भर द्या मुंबई, दि. २० : मुंबई महानगर प्रदेशासाठी २०५१ पर्यंत आणि पुणे महानगर प्रदेशासाठी २०४७ पर्यंतची लोकसंख्या, नागरीकरण तसेच उद्योगांची वाढती गरज लक्षात घेऊन एकात्मिक, कालबद्ध आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य दीर्घकालीन जलनियोजन तयार करावे. नवीन प्रकल्पांबरोबरच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण, पर्जन्यजल संचयन आणि पर्यायी […]
सैनिकी शाळांतील प्रवेश गुणवत्तेच्या आधारेच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन
मुंबई, दि. २० : राज्यातील सैनिकी शाळांमध्ये गुणवत्ताधारित प्रवेश प्रक्रिया अधिक सक्षम करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्यात येईल. शाळांच्या कामगिरीनुसार जिथे कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे तिथे प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. सैनिकी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि उत्तरदायी व्यवस्था निर्माण करण्यावर या संदर्भातील धोरणात भर देण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. […]







