ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन

नागपूर, दि. १२ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोराडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज आहे. शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळो, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीकडे घातले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अल्टिमेटमनंतर आरोग्य विभागाला जाग* महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या; प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलावले

अहेरी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम दिसून आला आहे. दोन दिवसांत पदभरतीसह आवश्यक कार्यवाही करण्याचा इशारा मिळताच आरोग्य विभागाने हालचालींना वेग दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी काही तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात पारंपरिक ‘बथुकम्मा’चा जल्लोष; १३ ऑक्टोबरला रंगणार भव्य सांस्कृतिक सोहळा, सुप्रसिद्ध गायिका निर्मला राठोड यांची मुख्य उपस्थिती*

सिरोंचा प्रतिनिधी: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यामध्ये सध्या पारंपरिक बथुकम्मा उत्सवाचा मोठा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक जयस्तंभ मैदान, सिरोंचा येथे एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण तेलंगणातील ख्यातनाम आणि अत्यंत लोकप्रिय लोकगायिका निर्मला राठोड यांच्या सुमधुर गायनाचा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात पारंपारिक ‘बथुकम्मा’ महोत्सवाची धूम; १४ ऑक्टोबरला प्रसिद्ध गायिका मधुप्रीया यांच्या सुश्राव्य गीतांची मेजवानी*

  सिरोंचा: तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपारिक ‘बथुकम्मा’ (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. या संपूर्ण परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये या सवाबाबत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली त्यांची अपार श्रद्धा यांचे दर्शन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात सुसज्ज जिमचे लोकार्पण; क्रीडाप्रेमी व युवा वर्गात आनंदाचे वातावरण*

  सिरोंचा: नगरपंचायतचे पुढकार आणि युवा मुलांच्या आरोग्याचा व फिटनेसचा विचार करून, सिरोंचा येथील जुन्या ग्रामपंचायतच्या प्रांगणात (कोत्तागुडम रोड, सिरोंचा मॉलजवळ) नवीन जिम (व्यायामशाळा) सुरू करण्यात आली आहे. या जिमसाठी शासनाकडून स्लॅब मंजूर (शॅन्सन) करण्यात आला असून, आता ही जिम नागरिकांसाठी अधिकृतपणे खुली झाली आहे. प्रशासनाच्या या आरोग्यदायी निर्णयामुळे परिसरातील युवा वर्गामध्ये कमालीचा आनंद पाहायला […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण आ. धर्मराव बाबा आत्राम यांचा अल्टिमेटम, दोन दिवसांत पदे भरा; अन्यथा कुलूप ठोकणार!

    अहेरी : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील गरोदर माता व बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२५ रोजी लोकार्पण झालेल्या या रुग्णालयाला वर्ष पूर्ण होत आले, तरी नियमित पदे पूर्णपणे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली देशात अव्वल! नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक

कृषी व जलसंपदा क्षेत्रातही राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक गडचिरोली, दि.०९ : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीतील एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे कृषी व जलसंपदा क्षेत्रातील कामगिरीतही गडचिरोलीने राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात; पीक नुकसानभरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी The गडविश्व मुलचेरा, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडल्याने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा

मुंबई, दि. १०: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले. वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, काशीजवळील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी

केंद्रीय पथकाकडून बीड जिल्ह्यात १५ ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि. १० :मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने सलग दुसऱ्या दिवशी बीड जिल्ह्यातील 15 ठिकाणी भेटी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीकेली.दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव […]