पेरिमिली,बोरी,राजाराम (खांदला),दुब्बागुडम, मेडपल्ली,तानबोडी,येरमनार येथील विविध पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला प्रवेश..!!* *युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियता;यंदा राजेंचीच लहर,जंबो पक्षप्रवेशाने विरोधकांना धडकी.*

*पेरिमिली,बोरी,राजाराम (खांदला),दुब्बागुडम, मेडपल्ली,तानबोडी,येरमनार येथील विविध पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत केला प्रवेश..!!*

*युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियता;यंदा राजेंचीच लहर,जंबो पक्षप्रवेशाने विरोधकांना धडकी.*

*अहेरी:-* आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी कार्यकर्ते तथा पदाधिकार्‍यांच्या तालुकानिहाय बैठकी घेणे सुरु करताच सर्वच तालुक्यात कार्यकर्त्यांचे लोंढे राजे साहेबांच्या नेतृत्वाकडे मोठ्या प्रमाणात वळतांना दिसत आहेत.अहेरी तालूक्यातील आयोजीत केलेल्या कार्यकर्ता बैठकीत *पेरिमिली,मेडपल्ली,दुब्बागुडम,बोरी,राजाराम (खांदला),येरमनार,तानबोडी* या क्षेत्रातून विविध पक्षातील अक्षरशः शेकडो कार्यकर्ते राजे साहेबांच्या कंपुत सामिल झाले. गावोगावचे राजे साहेबांना आमंत्रण असुन पुन्हा मोठ्या संख्येने गावात कार्यक्रम आयोजित करुन गावकरीच एकत्रीतपणे यंदा राजे सांगतील तेच तोरण बांधण्याच्या तयारीत असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगीतले.राजे साहेबांची राजकीय ताकत दिवसेंदिवस वाढतच असल्याने विरोधकांना धडकी भरली आहे.

माझ्यावर विश्वास करून तुम्ही प्रवेश केला आहे, तुमचा विश्वासघात मी कदापी होऊ देणार नाही, तुमच्या क्षेत्रांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले, त्याला *राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है* अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली..!!

राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत सातत्याने प्रवेश होत आहे तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे.