ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

*सिरोंचात सुसज्ज जिमचे लोकार्पण; क्रीडाप्रेमी व युवा वर्गात आनंदाचे वातावरण*

 

सिरोंचा:

नगरपंचायतचे पुढकार आणि युवा मुलांच्या आरोग्याचा व फिटनेसचा विचार करून, सिरोंचा येथील जुन्या ग्रामपंचायतच्या प्रांगणात (कोत्तागुडम रोड, सिरोंचा मॉलजवळ) नवीन जिम (व्यायामशाळा) सुरू करण्यात आली आहे. या जिमसाठी शासनाकडून स्लॅब मंजूर (शॅन्सन) करण्यात आला असून, आता ही जिम नागरिकांसाठी अधिकृतपणे खुली झाली आहे. प्रशासनाच्या या आरोग्यदायी निर्णयामुळे परिसरातील युवा वर्गामध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे.
युवकांच्या मागणीला यश
सिरोंचा शहरातील युवा मुलांकडून गेल्या अनेक दिवसांपासून एका चांगल्या आणि सुसज्ज जिमची मागणी केली जात होती. युवकांची हीच गरज ओळखून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष घातले. जुन्या ग्रामपंचायतच्या मोकळ्या प्रांगणाची यासाठी निवड करण्यात आली आणि पाठपुरावा करून जिमच्या इमारतीसाठी स्लॅब मंजूर करून घेतला.
नागरिकांची नियमित हजेरी
सध्याच्या धावपळीच्या युगात शरीर तंदुरुस्त (फिटनेस) राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या याच आरोग्याचा विचार करून ही जिम उभारली आहे. जिम सुरू झाल्यापासून परिसरातील नागरिक, ज्येष्ठ आणि विशेषतः तरुण मुले दररोज सकाळी व संध्याकाळी येथे व्यायामासाठी नियमित हजेरी लावत आहेत.
प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सिरोंचा परिसरातील आरोग्य आणि फिटनेस संस्कृतीला मोठी चालना मिळणार असून, नागरिकांनी या सुविधेबद्दल प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले आहेत.

G K