ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर येणार ४० हजार गावांतील गणेशकथा

मुंबई, दि. २९ : सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी- मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा

मुंबई, दि.२३ : थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई, दि. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य सरसकट मदत, पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी धाराशिव, दि.२३ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ; मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन

बीड, दि १७ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आणि धानोरा रस्त्यावरील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या उभारणीकरिता गतीने नियोजन करणार- मंत्री जयकुमार रावल प्रकल्पामुळे शेतमाल निर्यातीला नवी दिशा; रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार

मुंबई, दि. १५ : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी बाजाराच्या उभारणीला गती देण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. वाढवण बंदराच्या निकटतेचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील शेतमालाला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचविण्यासाठी दापचरी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्प राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारव्यवस्थेशी जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

इंजिनिअरिंग प्रवेशाची शेवटची संधी! ५० हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त; ‘या’ ट्रेडला सर्वाधिक पसंती

 अभियांत्रिकी प्रवेशाच्या केंद्रीभूत प्रक्रियेच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर राज्यातील तब्बल १ लाख ५२ हजार ४५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, अद्याप ५० हजार ८४१ जागा रिक्त असून या जागांसाठी संस्थात्मक फेरी सुरू झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाची संधी अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. संस्थात्मक तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाची प्रक्रिया १४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुक्त विद्यापीठाचा मोठा निर्णय! बी.कॉम अन् एमसीए आता घरी बसून ऑनलाइन शिकता येणार; प्रवेश क्षमतेची मर्यादा नाही

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आता ‘बी.कॉम’ आणि ‘एमसीए’ हे पदवी अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश क्षमतेची कोणतीही मर्यादा नसून कितीही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. ऑनलाइन प्रॉक्टर पद्धतीने परीक्षा होणार असून १०० विद्यार्थ्यांमागे एक मेंटॉर मार्गदर्शन करणार आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाच हजार ‘लालपरी’ बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने बसताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. नव्या बसेसच्या माध्यमातून एसटीची सेवा अधिक सक्षम करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याच दिशेने पाच हजार ‘लालपरी’ […]