माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा सहकार्याने आंबटपल्ली येथे “बहीण लाडाची,वहिनी काळाची” दंडार कार्यक्रमाचं आयोजन…!
*मूलचेरा* : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होत आहे.मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शारदा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.नवरात्री उत्सव निमित्ताने प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी दांडिया,दांडर,संगीतसह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना.आंबटपल्ली येथील शारदा मंडळाचे पदाधिकारी महिला सदस्यांनी भेट देऊन आपल्या शारदा महिला मंडळ येथील पटांगणात दंडार कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सहकार्य करण्यात यावा म्हणून विनंती केली.त्यावेळी राजे साहेबांनी महिला मंडळाच्या विनंतीस मान देऊन दंडार कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केलं.
‘दंडार’ कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या उत्साहात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरसेवक दिलीप आत्राम, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक उमेश पेडुकर,ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे,माजी उपसरपंच गणेश बँकावार,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कलसार,पोलीस पाटील युक्तेश्वर मडावी,पेसा अध्यक्ष दिवाकर शेडमेक,ग्रामपंचायत सदस्य संजय पुरकलवार,गणेश गारघाटे तसेच महिलावर्ग आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!


