माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी अहेरी शहरातील विविध समाजाच्या कोजागिरी कार्यक्रमाला दिली भेट.
कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने दिल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
*अहेरी:-* हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे.अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच ‘कोजागरी पौर्णिमा’ साजरी केली जाते.कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते.या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात.शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खुप जवळ येतो,त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने खुप मोठा दिसतो.या दिवशी चंद्र प्रकाशात दूधाची बांसुदी तयार करतात.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि सर्व भक्तांना आशीर्वाद देते आणि देवी लक्ष्मीची कृपादृष्टी सर्व भक्तांवर राहते अशी मान्यता आहे.
स्थानिक अहेरी शहर येथील अनेक प्रभागात सोनार,पद्मशाली,गाडली,कोमटी समाज बांधवांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे उपस्थित होते.समाज बांधवांनी त्यावेळी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.त्यावेळी राजे साहेबांनी सर्व समाज बांधवांना कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनःपूर्वक सर्वांना शुभेच्छा दिल्या.दुधाची बासुंदीचा आस्वाद घेत आनंद द्विगुणीत केला.
यावेळी सोनार,पद्मशाली,गाडली,कोमटी समाज बांधव व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


