गडचिरोली

शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचा आढावा; राजे अम्ब्रीशराव महाराजांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन!

मुलचेरा:- तालुक्यातील शांतिग्राम-कोठारी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची आढावा सभा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लगाम येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजे अम्ब्रीशराव महाराज म्हणाले की,येत्या काही महिन्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच जोमाने कामाला लागावे.गावागावांत जाऊन नागरिकांशी संपर्क वाढवावा, पक्षाचे संघटन मजबूत करावे तसेच जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले.

सभेदरम्यान आगामी निवडणुकांची तयारी,संघटनात्मक बांधणी तसेच स्थानिक राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुलचेरा,एटापल्ली,अहेरी,सिरोंचा व भामरागड या पाचही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी दिले.

यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,तालुकाध्यक्ष संजीव सरकार,सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते, मारोती पेंदाम,बूथ प्रमुख तसेच परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

header