गडचिरोली

मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती.

मोद्दूमडगू येथे श्रीमद् भागवत कथेचा भक्तिमय सोहळा;माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांची उपस्थिती.

पूज्य बंकिम चंद्र महाराज यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथेचे निरूपण; ‘राधे-राधे’च्या जयघोषाने मोद्दूमडगू परिसर दुमदुमला!

*आलापल्ली:-* मोद्दूमडगू येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा सोहळ्याला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी विधिवत पूजन करून श्रीमद् भागवत ग्रंथाचे दर्शन घेतले तसेच कथा श्रवणाचा लाभ घेतला.त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

छत्तीसगड येथील पूज्य श्री बंकिम चंद्र महाराज यांच्या मुखातून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण सुरू असून,त्यांच्या ओघवत्या वाणीतून भगवान श्रीकृष्णांच्या लीला,भक्ती,श्रद्धा आणि धर्मविचारांचा भाविकांना परिचय करून दिला जात होता.कथेदरम्यान भाविक तल्लीन होऊन श्रवण करत असून,संपूर्ण परिसरात ‘राधे-राधे’चा जयघोष घुमत असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते .

या धार्मिक सोहळ्याला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, अभिजित शेंडे,यांच्यासह परिसरातील नागरिक,महिला-पुरुष आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

भक्ती,श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडविणाऱ्या या भागवत कथा सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

header