माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी घेतले सत्य साई मंदिरात दर्शन!
*मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराच्या विकासकामांबाबत मंदिर समितीशी केली चर्चा!*
*आलापल्ली:-* मोद्दूमडुगु अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी मोद्दूमडुगु येथील सत्य साई मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांनी मंदिर समितीच्या सदस्यांशी आस्थेने संवाद साधत मंदिराच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली.तसेच मंदिर परिसरातील विविध विकासकामे आणि भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी मंदिराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम हे उपस्थित होते.





