माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्वाखाली 120 कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिरोंच्या तालुक्यातील रेगुंठा येथे खिंडार

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्वाखाली 120 कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिरोंच्या तालुक्यातील रेगुंठा येथे खिंडार..!

अहेरी:- माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची दिवसेंदिवस जनसामान्यांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण होतांना दिसत आहे.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत दररोज मोठ्या प्रमाणावर अनेक पक्षातील कार्यकर्ते नाग विदर्भ आंदोलन समितीला समर्थन करत पक्ष प्रवेश करत आहेत.

सिरोंच्या तालुक्यातील रेगुंठा येथील डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत 120 कार्यकर्ते यांनी पुरुषोत्तम कादरलावार,आकाश बाचालकुरा यांच्या पुढाकाराने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्वाखाली अहेरी येथील रुक्मिणी महाल येथे पक्ष प्रवेश केला.त्यावेळी राजे साहेबांनी त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.!
“राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है”अशी घोषणा बाजी यावेळी करण्यात आली.अहेरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सिरोंच्या तालुक्यात जब्बर धक्का बसला असे मानल्या जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समिती तर्फे आपला नामांकन अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला.त्यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य जनता सहभागी होती.राजे लाखोंच्या मताने निवडणूक जिंकणार आणि अहेरी विधानसभा विकासाच्या प्रगतीपथावर असणार,असे आज जनतेने ठरविल्याचे चित्र दिसत आहे.