गडचिरोली: लोकसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यात दि. 19 एप्रिल 2024 रोजी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून कृषी विद्यापीठाच्या इमारतीत सुरु होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी […]
Month: November 2024
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन गडचिरोली,, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. […]
शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 12 वी परीक्षेचा निकाल पाहता येणार
गडचिरोली, दि. 20 : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, […]
राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा
गडचिरोली,: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दर वर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिन दिनांक १६ मे २०२४ रोजी साजरा करण्यात आला. १६ मे हा दिवस डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी या करता साजरा करण्यात येतो. “समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा” ही या वर्षीची […]
जंगली हत्ती पासून सावध राहा वन विभागाकडून नागरिकांना सूचना
गडचिरोली,दि.03 (जिमाका): भामरागड वन परिक्षेत्रातील जंगली हत्ती पुढे छत्तीसगढ राज्यातील जंगलात जाण्याची शक्यता असून त्यांचे द्वारे कोणतीही जिवीत हानी होवु नये म्हणुन गावकऱ्यांनी घराच्या बाहेर एकटे रात्री अपरात्री निघू नये व हत्ती दिसल्यास त्याची छेडखानी न करता त्याबाबत तात्काळ वन विभागास कळवावे, असे उपवनसरंक्षक भामरागड वन विभाग यांनी कळविले आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी वन […]