मुलचेरा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे दिनांक 21जुलै ला देवदा- रेगडी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडून वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. ही बाब आपल्या महसूल विभागाच्या पथकासोबत अतिवृष्टिग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुलचेऱ्याचे तहसिलदर चेतन पाटील यांना कळताचं त्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने झाड बाजूला हटवून […]
Month: November 2024
रेगडी धरण परिसरात पर्यटकांनी खबरदारी बाळगावी तहसिलदार चेतन पाटील
मुलचेरा- मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे कन्नमवार जलाशय ( रेगडी धरण) हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे आलेल्या पर्यटकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी धरण परिसरात फिरताना खबरदारी घ्यावी तसेच पाण्याच्या प्रवाहात आणी सांडव्यावरून जाण्यास प्रशासनातर्फे प्रतिबंध करण्यात आलेला असल्यामुळे सर्व नागरिकांनी उचित ती खबरदारी घेण्याचे […]
शेतकऱ्यानी महाडीबीटी अंतर्गत योजनाचा लाभ घ्या तालुका कृषी अधिकारी विकास पाटील
मुलचेरा: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वर्ष २०२४-२५ अंतर्गत ‘अन्नधान्य पिके फ्लेक्झी’ या घटकांतर्गत तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. राष्ट्रीय पाइपलाइनसाठी अन्नसुरक्षा अभियानांतर्गत विविध घटकांसाठी तालुका कृषी कार्यालयाकडे २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पंप संच घेण्यासाठी निकषानुसार ५० टक्के किवा १० हजार रुपये देण्यात येणार आहे. यासाठीही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना […]
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड
नागरिकांशी संवाद प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना गडचिरोली : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, […]
ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसाहाय्य; ‘वयोश्री’साठी अर्ज करा तहसिलदार चेतन पाटील
नागरिक अनभिज्ञ: तीन हजार रुपये साहित्य-उपकरणे खरेदीसाठी मुलचेरा:-वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने तसेच उपकरणे खरेदी करावी लागतात. तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत […]
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला दिली दहा हजार रुपये आर्थिक मदत.
मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील […]
मुलचेरात महसूल कर्मचार्यांच्या काम बंद आंदोलन
मुलचेरा:- महसूल विभागात ४० टक्के पदे रिक्त असून, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, दुसर्या दिवशी म्हणजेच १६ जुलै रोजी देखील महसूल कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या संपात मुलचेरा येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे […]
शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी
तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा:तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन मुलचेराचे तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ऑक्टोबर-नोव्हेबर २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी […]