ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार  करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

 ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात […]