महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले निर्देश राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भागातील विद्युतपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती उद्भवलेल्या भागातील विद्युत पुरवठा पूर्ववत […]