मुलचेरा-: दिनांक 1 आगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत *सैनिक हो तुमच्यासाठी*हा विशेष उपक्रम मुलचेऱ्याचे प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांच्या अध्यक्षतेखली तहसील कार्यालयात दिनांक 10 आगस्ट ला आयोजीत करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांचे हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.देशाच्या रक्षणासाठी, आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या प्राणाची बाजी लावीत असतात असे प्रतिपदान प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांनी केले. सदर कार्यक्रमात माजी सैनिकांनी आपल्या गतकाळातील गोष्टींना उजाळा देत देशासाठी केलेल्या अभूतपूर्व साहसाची माहिती दिली. आजच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयातील कर्मचारी, शिपाई उपस्थित होते.
Related Articles
आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस
दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राजभवन […]
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचा तपशील : पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह ब्रांच 1) SSC […]
नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न
मुंबई, दि. 5 : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंन्द्र बहादूर सिंह, श्रीमती चारू सिंह, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, […]