आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत
गडचिरोली दि.13 : राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम क्षेत्रात मोडतो. येथे शांततामय वातावरणात निवडणूका घेणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस प्रशासनाने काय तयारी केली आहे, याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांची विशेष मुलाखत 14 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ या कार्यक्रमाचे आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारण होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
निवडणूक आचार संहिता काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची भुमीका, प्रचार सभा, रॅली, यासाठीची खबरदारी, मतदान केंद्रावरील उपाययोजना, निवडणूक साहित्य आणि मतदान अधिकारी यांना सुरक्षीतपणे संवेदनशील मतदान केंद्रावर पोहचवणे आणि परत आणण्यासाठीच्या उपाययोजना, संभाव्य धोक्यांना प्रतिबंध करण्यासाठी आखलेली धोरणे, शांततापूर्ण निवडणुकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस विभागाचे नियोजन याबाबत श्री निलोत्पल यांनी मुलाखतीत ‘दिलखुलास’ माहिती दिली.