ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विधानसभा निवडणुकीसाठी महिला, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्र प्रत्येक मतदारसंघात एक मतदान केंद्र

    गडचिरोली, दि. 16 – मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहेत. यासोबतच दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित मतदान केंद्रही राहणार असून आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत.           

            महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये निवडणूक कर्तव्यावर तैनात सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. साधारणतः पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ज्या मतदान केंद्रावर जास्त असते त्या मतदान केंद्रांवर महिला नियंत्रित मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येते. त्याचप्रमाणे दीव्यांग व युवा मतदान केंद्रांवरील सर्व कामकाज दीव्यांग व युवा मतदान अधिकारी करणार आहेत.

            ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’, दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र, व युवा नियंत्रित मतदान केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिला, दिव्यांग व युवा मतदारांचा मतदानातील सहभाग व विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. ही मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली गेली आहे. संवेदनशील केंद्र टाळून ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड केली आहे. अधिकाधिक महिला, दीव्यांग व युवा वर्गातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

*अशी राहतील विशेष मतदान केंद्र*

*६७-आरमोरी मतदारसंघ : *

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं१३२ नगर परीषद मराठी प्राथमिक शाळा, खोली क्रमांक १ नैनपूर वार्ड, आरमोरी. 

दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रं१२५ हुतात्का स्मारक कन्नमवार वार्ड देसाईगंज.

युवा मतदान केंद्र क्रं.२२८ नगरपरिषद कार्यालय खोली क्रमांक १ आरमोरी.

आदर्श मतदान केंद्र क्रं.११६, नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा, नवीन इमारत पटेल वार्ड खोली क्रं.२, देसाईगंज (तुकुम वार्ड).

*६८-गडचिरोली मतदार संघ :*

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं ८८ पंचायत समिती कार्यालय, बचत भवन गडचिरोली. 

दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रं९२ खोली क्रमांक १, शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोली.

युवा मतदान केंद्र क्रं२२३ खोली क्रं४, जिल्हा परिषद शाळा, चामोर्शी.

आदर्श मतदान केंद्र क्रं.११२, खोली क्रमांक१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा, 

*६९-अहेरी मतदार संघ*

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं१४१ नागेपल्ली. दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रंमाक १४६ अहेरी, युवा मतदान केंद्र क्रं.८४ हेडरी, आदर्श मतदान केंद्र क्रं.१७३ सिरोंचा.