ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्फोट घडवुन आणण्यासाठी पेरलेले स्फोटके गडचिरोली पोलीस दलाने केले नष्ट

गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावीत जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करुन सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात. आगामी होणा­या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणा­या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके (IED) पेरून ठेवली आहेत अशी विश्वसनिय गोपनिय माहिती मिळाली होती.

 त्यावरून आज दि. 16/11/2024 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी तात्काळ गडचिरोलीहून एक (BDDS) बीडीडीएस पथक हेलिकॉप्टरच्या सहायाने घटनास्थळी पाठविण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस दल, सीआरपीएफ आणि बीएसएफच्या सुरक्षा दलांच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले. शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणा­या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED) सापडले. बीडीडीएस पथक सदर स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असतांना एका स्फोटकाचा (IED) स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (BDDS) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले.

 त्यानंतर सदर परिसरात अजुन स्फोटके पेरली आहेत का, याबाबत पुन्हा शोध अभियान सुरु केले. शोध अभियान सुरु असतांना त्याच परिसरात अजुन एक आयईडी (IED) (क्लेमोर) आढळुन आले. बीडीडीएस पथकाने मिळुन आलेले आयईडी (IED) (क्लेमोर) नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले. या सर्व कार्यवाहीत सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणा­या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने घातपात घडवुन आणण्याचा व सुरक्षा दलास नुकसान पोहचविण्याचा डाव हाणून पाडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली (BDDS) बीडीडीएसचे प्रभारी अधिकारी पोउपनि. मयुर पवार यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.