गडचिरोली,(जिमाका),दि.28: बाल न्याय अधिनियमाची पुर्तता न करता दत्तक विधान केल्यास संबंधित व्यक्ती ३ वर्षापर्यंत कैद किंवा ०१ लाख रुपयापर्यत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल तसेच कोणत्याही उद्देशाने बालकांची विक्री किंवा खरेदी केल्यास अशा व्यक्तींना ०५ वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि ०१ लाख रूपयांपर्यत दंडाची शिक्षेचे प्रावधान असल्याने दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीररित्या दत्तक विधानाची प्रक्रिया पुर्ण करून दत्तक विधान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्हयामध्ये लडु दत्तक विशेष संस्था, बंजरंग नगर गडचिरोली ही एक मान्यता प्राप्त विशेष दत्तक संस्था कार्यरत आहे. दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक घेण्याकरीता विशेष दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल कल्याण समितीमार्फत देशातील व विदेशातील भावी पालकांना बालके दत्तक देण्याचे कार्य चालु आहे. यासाठी दत्तक इच्छुक पालकांनी कारा या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
दत्तक इच्छुक पालकांनी कायदेशीर दत्तक प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता बालगृहे, विशेष दत्तक संस्था, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्यांशी अधिक माहीतीकरीता संपर्क साधावा. कार्यालय पत्ता बॅरेक क्रमांक ०१, खोली क्रमांक २६, २७ कलेक्टर कॉम्पलेक्स गडचिरोली दुरध्वनी क्रमांक:-०७१३२-२२२६४५ असे आवाहन प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.