ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटींच्या सुधारित तारखा जाहीर

सीईटी सेल’कडून विविध अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन वर्षीय विधी (लॉ) सीईटीसाठी यापूर्वीच नोंदणी सुरू केली आहे. आता पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख दोन फेब्रुवारीपर्यंत आहे. ही सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पदवी व पदव्युत्तरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षांच्या संभाव्य तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘सीईटी सेल’च्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी सीईटी वेळापत्रकानुसार होईल. एमएचटी सीईटी नऊ एप्रिल ते १९ एप्रिल रोजी होणार आहे. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची सीईटी २० ते २१ मार्च रोजी, तर पाच वर्षीय विधीची सीईटी २८ एप्रिल रोजी होईल. एमसीएची सीईटी २३ मार्चला, तर एमबीएची सीईटी एक ते तीन एप्रिलला होणार आहे. बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाची सीईटी ३० एप्रिल ते तीन मे या कालवधीत होणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पाच वर्षीय ‘लॉ सीईटी’साठी नोंदणी सुरू‘सीईटी सेल’कडून विविध अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीन वर्षीय विधी (लॉ) सीईटीसाठी यापूर्वीच नोंदणी सुरू केली आहे. आता पाच वर्षीय लॉ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख दोन फेब्रुवारीपर्यंत आहे. ही सीईटी २८ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’ने दिली.