ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

फेब्रुवारीचे 1500 आले, मार्च चा हप्ता कधी येणार! आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

फेब्रुवारीचे 1500 आले, मार्च चा हप्ता कधी येणार! आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

 फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. पण महिल्यांच्या खात्यात 1500 रू जमा झाले, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला.

आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले :

– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. 

– प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

– सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे.

2100 रू कधीपासून मिळणार

– पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत, यात कोणतीही शंका नाही. 2100 रुपये बाबत नियोजन सुरू आहे, आमच्या घोषणेचे नक्कीच पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.