राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा राजमहाल समोर विराजमान “अहेरीचा राजा” दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी..!! *#राजस्थान मधील “हवा महाल” अनेकांचा आकर्षणाचा केंद्र..!!

राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा राजमहाल समोर विराजमान “अहेरीचा राजा” दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी..!!

राजस्थान मधील “हवा महाल” अनेकांचा आकर्षणाचा केंद्र.

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव महाराज यांचा अहेरी राजमहाल समोर विराजमान श्रीकृष्ण अवतारातील *”अहेरीचा राजा”* गणेश दर्शनासाठी तसेच कलकत्ता येतील कारागिरांनी १ महिना अथक परिश्रम घेऊन संपूर्ण थर्माकोलने बनविलेले राजस्थान मधील *”हवा महल”* हे बघण्यासाठी सद्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे..!!

नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या “अहेरीचा राजा” ह्या गणरायाचा दर्शन घेण्यासाठी तसेच आकर्षक देखावा बघण्यासाठी अहेरी सह परिसरातील विविध तालुके तसेच लगतच्या तेलंगणा राज्यातूनही गणेश भक्तांची दररोज मोठी गर्दी होत आहे..!!

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या शुभ हस्ते दररोज सकाळ, संध्याकाळी मनोभावे आरती व गणेश पूजन केले जात असून ह्यावेळी राजमाता राणी रुक्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा सहित भाविकांची मोठी गर्दी असते..!!