शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन. मा.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी उपस्थित!

शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन.

मा.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी उपस्थित!

मुलचेरा:- अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनाद्वारे तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेल्या पिक नुकसानीबाबत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.

तसेच शासनाने शेतकऱ्यांना बियाणे,खत व इतर कृषी साधनांसाठी आर्थिक मदत देण्याचाही आग्रह निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी मुलचेरा तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तारमारे यांनी सांगितले की,“शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.त्यांचे झालेले नुकसान शासनाने तातडीने भरून काढावे,हीच आमची मागणी आहे.”

यावेळी भाजपच्या महिला मोर्चा सरचिटणीस रेखाताई डोळस,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्त्ता,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती,ग्रा.सदस्य बादल शाह,महामंत्री विजय बिश्वास,निखिल हलदार,तपन मल्लिक,गणेश गारघाटे, बाजीराव मडावी,फकिरा दुर्वा,गणेश बँकावार,नरहरी सरकार,सपन मंडल,शिवकुमार मंडल,आनंद हलदार,सिबू कर्मकार,विकास बैरागी,अनुप दास, उत्तम शर्मा तसेच मोठया संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.