गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सिरोंचा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा;विविध योजनांचा आढावा व मार्गदर्शन

जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) यांनी सिरोंचा तालुक्याला दिनांक २२ मे २०२५ रोजी दौरा केला. या दौऱ्यात तालुक्यातील विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रशासन व नागरिकांशी संवाद साधण्यात आला. दौऱ्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील टोकाचे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी राज्यस्तरीय जनजागृती राबवा – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

विधवा प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत जनजागृती करण्यात येते.  मात्र काही प्रमाणात अद्यापही अशा कृप्रथा सुरू असल्याचे निदर्शनास आले असून, या प्रथांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे. तसेच अशा प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक  राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी शाळांकडून होत असून या मागण्यांच्या अनुषंगाने आणि शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करावी, असे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन सुरू करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसुल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे / मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्स अॅपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरून निवृत्तीवेतन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पारंपरिक खाद्यसंस्कृती डिजिटल माध्यमातून नव्या पिढीकडे पोहोचविण्याचा प्रयत्न – मधुरा बाचल

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडत असताना, आता पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठीही डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जात आहे. आपल्या आजी, आईकडून शिकलेले पारंपरिक पदार्थ, मराठी खाद्यसंस्कृती नव्या पिढीला डिजिटल भाषेत सांगणे काळाची गरज आहे, असे मधुरा’ज रेसिपी, चॅनेलच्या प्रमुख मधुरा बाचल यांनी सांगितले. टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात “प्रवास पाककृतींचा” या विषयावर मधुरा बाचल यांचे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

कृषी सहायक संघटना करणार आंदोलन ऐन खरिपाच्या तोंडावर सोमवारपासून विविध टप्प्यांत पुकारला एल्गार

कृषी सहायक संघटना करणार आंदोलन ऐन खरिपाच्या तोंडावर सोमवारपासून विविध टप्प्यांत पुकारला एल्गार मुलचेरा: कृषी विभागाच्या होऊ घातलेल्याआकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.विविध टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले. सध्या कृषी सहायकांची […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई योजना माहिती विदर्भ

शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी

गडचिरोली, ता. १ मे – गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता. पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण

गडचिरोली दि .१ : गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संगीता सोनल भैसा गाव विहिटेकला प्रा आ केंद्र बोटेकसा तालुका कोरची, नंदा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार येणार आहे. गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा […]