मुलचेरा:- शासन निर्णय दि. 15 सप्टेंबर, 2024 अन्य दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1000/- रु. ची वाढ करून 2500/- इतके अनुदान D.B.T. प्रणाली द्वारे देण्यात येत आहे. करिता लाभार्थ्यांचे ऑनलाइन UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग, यांचे पत्र क्र. बैठक-2026/प्र.क्र.-22/काय-6 दि. 04.03.2026 चे अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाच्या […]
ताज्या घडामोडी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुलचेरा:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक १ अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील लगाम येथे शनिवारी (७ मार्च) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानात भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर […]
मुलचेरात दोन ठिकाणी होणार महाराजस्व समाधान शिबिर; पत्रकार परिषदेतून तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली माहिती
मुलचेरा: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार असून मुलचेरा तालुक्यात लगाम आणि मुलचेरा असे दोन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिली. विशेष म्हणजे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन ठरले […]
मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी
मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी केली. मुलचेरा दुर्गम व आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि बाजारपेठाभिमुख शेतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. मुलचेरा तालुक्यातील गोमणी मुख्यालयातील चिचेला येथील प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे […]
एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन. सुप्रसिद्ध गायिका कु.भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांच्या भक्ती-संगिताने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध.! एटापल्ली:- स्थानिक राजमुद्रा फाउंडेशन,समर्पण ट्रस्ट व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री […]
मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ*
गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामविकास विभाग, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. हा […]
‘महिला आयोग आपल्या दारी’ शुक्रवारी गडचिरोली जिल्हयात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन
महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या- रुपाली चाकणकर यांचे आवाहन गडचिरोली दि. १६ फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शुक्रवार दि. २० फेब्रुवारी, २०२६ रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून, आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११ वाजता […]
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उत्साहात उद्घाटन
गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : गडचिरोली जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा – २०२६ चा उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा […]
स्थानिक वापरासाठी रेती खरेदीसाठी महाखनिज पोर्टलचा वापर बंधनकारक,600 रुपये प्रति ब्रास दर.
मुलचेरा तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा, प्रतिनिधी –स्थानिक शासकीय तसेच वैयक्तिक बांधकाम साठी रेती (वाळू) खरेदी किंवा वाहतूक परवाना प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाखनिज पोर्टल (Mahakhanij) वरून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात मुलचेरा तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, शासनाने रेती […]
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार मुंबई, १२ : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात […]










