यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्षे 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3,798 मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या […]
मुंबई
शहरात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली जागेची पाहणी
गडचिरोली, ता. १ मे – गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जागेची पाहणी केली. यामध्ये नुकतेच अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेले प्रेक्षागृह तसेच मामा तलावाचे सौंदर्यीकरण व केंद्रीय विद्यालयासाठी जागेचा आढावा यांचा समावेश होता. पाहणी दौऱ्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, तहसीलदार संतोष आष्टीकर, तसेच […]
महाराष्ट्र दिनी आशा स्वयंसेविकांचा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव दुर्गम भागासाठी पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण
गडचिरोली दि .१ : गडचिरोली येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस मुख्यालय येथे ध्वजवंदन कार्यक्रमात आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकेंचा सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच दुर्गम भागासाठी पाच अत्याधुनिक रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संगीता सोनल भैसा गाव विहिटेकला प्रा आ केंद्र बोटेकसा तालुका कोरची, नंदा […]
ई-श्रम कार्डधारकांना 2 लाख रुपयांचा लाभ : E Shram Yojana in Marathi
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 2021 मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक राष्ट्रीय डेटाबेस ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकते. या कार्डचे फायदे, पात्रता आणि ऑनलाइन अर्जाविषयी आम्हाला माहिती आज आपण जाणून घेऊयात. या पोर्टलच्या मदतीने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. […]
सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता – पंतप्रधान नरेंद्र मोदी
व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने आपल्या परीने जोपासावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ (जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट) चा आरंभ झाला. यावेळी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ मधील विजेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी संवाद […]
सहपालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्य करण्याच्या सूचना
गडचिरोली, दि. 1 मे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे उद्घाटन आज राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, प्रभारी जिल्हा पोलीस […]
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार येणार आहे. गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा […]
भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक ‘वेव्हज्-२०२५’ महोत्सव
भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा… १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रेरणादायी स्वप्न मांडले ते म्हणजे “आपण एका परिषदेपासून सुरुवात करू आणि तिला दावोसच्या धर्तीवर जागतिक परिषद बनवू.” या दृष्टिकोनाला साकार करणारा एक भव्य उपक्रम म्हणजे […]
जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे
केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासाठी धोरण व […]
एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील […]