गडचिरोली,(जिमाका),दि.25: आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी (MPSC) पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.1000 ( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज दि.01 नोव्हेंबर 2024 पासुन 28 नोव्हेंबर 2024 पर्यत या कार्यालयात सादर करावेत तदनंतर मुलाखत दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहीती व मार्गदर्शन केद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Related Articles
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मुंबई, दि. 16 :- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्मृतिस्थळावर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, अन्न […]
SBI स्कॉलरशिप प्रोग्राम मिळणार 15,000 रू.| SBI Asha Scholarship Apply Now 2022
September 20, 2022 Unknown author SBI स्कॉलरशिप प्रोग्राम मिळणार 15,000 रू.| SBI Asha Scholarship Apply Now 2022 – SBI Asha Scholarship Apply Now 2022 – स्टेट बँक ऑफ इंडियाची CSR शाखा आहे. बँकिंगच्या पलीकडे सेवा करण्याच्या आपल्या परंपरेनुसार, फाउंडेशन सध्या भारतातील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ग्रामीण विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, उपजीविका आणि उद्योजकता, युवा सक्षमीकरण, खेळांना प्रोत्साहन […]
अहेरी नगरीत पहिल्यांदाच हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त खास कार्यक्रम स्नेहा लॉन येथील भव्य पटांगणात 20 ऑक्टोबर रोजी आयोजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अहेरी राजनगरीत पहिल्यांदाच *हास्यकल्लोळ व नृत्यांचा नजराणा* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा […]