गडचिरोली दि १५:- समाज कल्याण विभाग नागपुर आणी इतर मागास बहूजन कल्याण नागपूर विभागातील अधिकारी कर्मचारी व विद्याथ्याचे विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव दिनांक 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान निवासी शाळा संकूल येथे मोठया उत्साहात पार पडला. यावेळी नागपूर विभागातील सहा जिल्हातून तब्बल 1200 अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रथमच 22 विविध क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला तसेच क्रीडा
महोत्सवाच्या दरम्यान दररोज सकाळी झुंबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
झालेल्या सांस्कृतीक कार्यकमामध्ये सामुहिक नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक गडचिरोली तर द्वितीय
क्रमांक वर्धा यांनी पटकावीला तसेच नाटकामध्ये प्रथम क्रमांक नागपूर यांनी पटकाविला. फॅशन शो
स्पधेत प्रथम क्रमांक चंद्रपूर, द्वितीय क्रमांक भंडारा तर तृतीय क्रमांक गोंदिया यांनी पटकाविला.
मैदानी क्रीडा प्रकारात क्रिकेट मध्ये गडचिरोली यांचा प्रथम क्रमांक तर प्रादेशिक कार्यालय
नागपूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावीला. पुरूष कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक वर्धा तर द्वितीय क्रमांक
भंडारा, खो-खो मध्ये प्रथम क्रमांक भंडारा तर द्वितीय क्रमांक गडचिरोली. व्हॉलीबॉल मध्ये गोंदिया
प्रथम क्रमांक तर चंद्रपूर द्वितीय क्रमांक पटकावीला. महीला क्रीडा प्रकारात व्हॉलीबॉल मध्ये नागपूर
प्रथम तर गडचिरोली यांनी द्वितीय क्रमांक पटकावीला कबड्डी मध्ये गडचिरोली प्रथम तर गोंदिया
द्वितीय क्रमांक पटकावीला. खो-खो मध्ये गोंदिया प्रथम क्रमांक तर गडचिरोली द्वितीय क्रमांक
क्रिकेट मध्ये नागपूर प्रथम तर गडचिरोली द्वितीय क्रमांक पटकावीला तसेच एथलेटीक मध्ये वर्धा
यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. सर्व स्पधेत जनरल चॅम्पीयनशीप गडचिरोली अव्वल स्थान व
वर्धा द्वितीय स्थानी तर भंडारा तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच निवासी शाळा विद्यार्थामध्ये
गडचिरोली अव्वल तर चंद्रपूर द्वितीय क्रमांक पटकावीला. तसेच आश्रमशाळा
(विजाभज ) विद्यार्थामध्ये गडचिरोली अव्वल तर चंद्रपूर द्वितीय स्थान पटकावीला.
श्री.देवसुदन धारगावे उपायुक्त, श्री. विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त, श्रीमती. संजीवनी
थोरात पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला किन्नाके, पोलीस निरीक्षक डॉ. सचिन मडावी सहाय्यक
आयुक्त, श्री. सुखदेव कौरती समाज कल्याण अधिकारी, श्री. कुलदिप मेश्राम सलेअ यांच्या
उपस्थीतीत बक्षीस वितरण संपन्न झाला.
डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त यांचे नेतृत्वात समाज कल्याण गडचिरोली येथील सर्व
कर्मचारी यांनी हा क्रीडा महोत्सव पार पाडला त्यासाठी यांचे अभिनंदन करण्यात आले.सांस्कृतीक कार्यक्रमाचे संचालन श्री. सचिन फुलझेले यांनी केले तर उपस्थीत सर्व
मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री. गोविंदलवार यांनी केले.
