*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी महागाव बुज येथील मृत इसमाचा शव स्वगावी आणण्यास केली आर्थिक मदत!*
*उपसरपंच संजय अलोने यांच्याकडूनही मदतीचा हात!*
*अहेरी:-* महागाव बुज येथील सुरेश चिन्ना आत्राम यांच्या पोटात अचानकपणे दुखने सुरू झाले असता तातडीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले परंतु तब्बेतीची गंभीरता लक्षात गडचिरोली सामान्य रूग्णालय येथे रेफर केले. तिथे उपचार सुरू असतांना रात्रो ११:०० ते १२:०० वाजता मृत झाली. त्यांची आर्थिक परिस्थीती फारच हालाखीची असल्याने गडचिरोलीवरून त्यांचा प्रेत आणन्यासाठी त्याच्या नातेवाईकाकडे पैसे नव्हते प्रकरणाची गंभिरता लक्षात घेऊन गावातील उपसरपंच संजय अलोने यांनी राजे अम्ब्रिशराव यांना मोबाईल वरून प्रकरण कळताच तेव्हा तात्काळ मदत म्हणून साई झाडे यांच्या कडे शव वाहीकेला देण्यासाठी ५००० रू दिले व उपसरपंच संजय अलोने यांच्या कडून ५००० रुपये मृत सुरेश आत्राम यांच्या परिवारास आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.
यावेळी रविभाऊ नेलकुद्री सदस्य दिपाली कांबळे, सदस्य लालू वेलादी, सरपंच पुष्पा मडावी, मदना वेलादी, शेका पानेम, सत्यन्ना पेंडलीवार, सुरेश वेलादी, संजय टेकूल विनोद जिल्लेवार,अन्वेष गड्डेवार,राकेश कोसरे उपस्थित होते!


