*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कनेपल्ली येथील कु.रोजा नरेश बोमन या मुलीला पुढील उपचारासाठी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!*

*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कनेपल्ली येथील कु.रोजा नरेश बोमन या मुलीला पुढील उपचारासाठी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!*

*अहेरी:-* तालुक्यातील खमणचेरू ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कनेपल्ली या गावातील कु.रोजा नरेश बोमन ही गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने त्रस्त आहे,
तीला चंद्रपूर येथील चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक अडचणी होत आहेत.
ही बाब स्थानिक कार्यकर्ते यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळवली,त्यावेळी राजे साहेबांनी कनेपल्ली येथील बोमन कुटूंबातील सदस्यांना बोलावून त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना पुढील उपचारासाठी  10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत केली.

त्यावेळी बोमन कुटुंबातील सदस्य गण उपस्थित होते..!