ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी, तरच बहीण मुख्यमंत्र्यांची लाडकी महिलांमध्ये उत्सुकता, १ जुलैपासून स्वीकारणार अर्ज प्रभारी बाल विकास अधिकारी अमरी बिस्वजीत राॅय

मुलचेरा:-

राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या घोषणेनंतर महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात दाटून आली असावी. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये पात्र, अपात्रतेच्या अटी असून, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल अशाच बहिणींना मुख्यमंत्र्यांचे लाडाचे आशीर्वाद मिळणार आहे.

दरमहा १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केल्यानंतर ताबडतोब सरकारने त्या संदर्भातील शासन परिपत्रक काढले. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविली जाणार असून, वयाची २१ ते ६० वर्षांपर्यंतच्या विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, निराधार महिलांना अर्ज करता येणार आहे. अर्जदार महिला महाराष्ट्राची

मात्र, या चांगल्या योजनेची एवढीच अपेक्षा आहे.

रहिवासी, स्वतंत्र बँक खाते आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे. तसेच कुटुंबातील सदस्य, शासकीय कायम आणि कंत्राटी कर्मचारी, आमदार, खासदार कुटुंबातील सदस्य, शासनाच्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आणि पाच एकरांच्या वर शेतजमीन असलेल्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

१ ते १५ जुलैपर्यंत योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने तसेच

अंमलबजावणी प्रामाणिकपणे व्हावी

या नव्या योजनेच्या घोषणेमुळे महिलांमध्ये उत्साहाची वातावरण असून, मुख्यमंत्र्यांच्या लाडाचे १५०० रुपये मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या बहिणींची झुंबड उडालेली दिसेल यात शंका नाही. अंमलबजावणी प्रामाणिकपणे व्हावी

अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या ठिकाणी अर्ज भरून देता येणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीपुढे अंतिम यादी तयार होऊन दर महिन्याच्या १५ तारखेला लाभार्थी महिलेच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

या योजनेकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये जन्माचा दाखला, डोमेसिअल,२५०००० च्या आत उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक, दोन फोटो, रेशन कार्ड आणि अर्जदाराने दिलेली माहिती खरी असल्याचे हमीपत्र यांचा समावेश आहे.