ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन

गडचिरोली,(जिमाका),दि.02:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 6 वी ते 9 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता 7वी ते 9 वी वर्गातील अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी चे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जमाती/ आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये सहा लक्ष पेक्षा कमी असावे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, व इतर मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील अनुसुचित जमाती/ आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परिक्षेचे आयोजन दिनांक 23 फेब्रुवारी, 2025 रोजी इयत्ता 6 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळेत व इयत्ता 7 वी ते 9 वी च्या सकाळी 11.00 ते 14.00 या वेळेत करण्यात येत आहे.

                 इयत्ता 6 वी ते 9 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसुचित जमाती आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश फॉर्म प्रकल्प कार्यालय, भामरागड, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, ताडगांव व कसनसूर तसेच शासकिय आदिवासी मुलांचे वसतिगृह, एटापल्ली येथिल माहिती व सुविधा केंद्र, एटापल्ली येथून प्राप्त करुन घ्यावे. तसेच अद्यावत माहिती भरलेले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत वरिलप्रमाणे नमुद ठिकाणी दिनांक 25 जानेवारी 2025 पर्यंत सादर करण्यात यावे. नमुद दिनांकानंतर अर्ज स्विकारले जाणार नाही. याची नोंद घेण्यात यावी.

                 सदर ची प्रवेश पुर्व परिक्षा 1) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, ताडगांव ता. भामरागड जि. गडचिरोली 2) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कसनसूर ता. एटापल्ली जि. गडचिरोली या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर दिनांक 23 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता उपस्थित करण्यात यावे. विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी संबंधीत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व इतर शाळा तसेच पालकांची राहील. सदर परिक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन नमन गोयल (भा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली यांनी केले आहे.