- लोकाभिमुख प्रशासनावर भर देणार
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचे निर्देश
गडचिरोली दि.१०: जिल्हाधिकारी श्री संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
श्री विजय भाकरे यांनी आज दिनांक १० जून रोजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री भाकरे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरीप पिक कर्ज वाटप, तसेच बियाणे, खते व फवारणी औषध उपलब्धतेचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री भाकरे यांनी दिले असून तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.