*गडचिरोली येथील आशीर्वाद नगरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा*
*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती!*
*गडचिरोली:-* शहरातील आशिर्वाद नगर,चामोर्शी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळा स्पर्धेच्या चिमुकल्यांनी आपापल्या नंदीबैलांना घेऊन प्रचंड गर्दी केली होती.
तान्हा पोळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज होते,कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले,तान्हा पोळा हा विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या सण आहे,आपल्या जिल्ह्यामध्ये तान्हा पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात,बाल-गोपाळ मोठ्या आनंदात इथे येत असतात,तान्हा पोळ्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य पुढेही करत राहा,माझे सहकार्य आपल्याला सदैव राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केल.
तान्हा पोळ्यात लहान नंदी पासून ते तब्बल चार ते पाच फूट उंच असलेले नंदीही या पोळ्याचे आकर्षण ठरले,तसेच सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली *लाडकी बहीण योजना* याची प्रतिकृती साकारलेले चिमुकलेही आकर्षणाचा भाग ठरली.
तसेच वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि केशभूषा करून आलेले बालगोपाल आणि त्यांचे निरनिराळे सजावट करून आणलेले नंदीबैल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.कुणी शेतकऱ्यांची,तर कोणी सध्या सुरू असलेल्या डॉ.मोमिता यांच्या विषयीची तसेच मुलींच्या आत्मसंरक्षणाची तसेच कोणी भगवान शंकर तसेच कोणी महाराष्ट्रीयन परंपरा जपणारी तसेच आकर्षक वेशभूषा करून आकर्षक रित्या सजविण्यात आलेल्या आपल्या नंदीबैलाला घेऊन या तान्ह्यापोळ्यात सहभागी झाले होते.
तान्ह्यापोळ्यात राजे साहेबांच्या हस्ते स्पर्धेतील अनेक बाल-गोपालांना विविध बक्षीसे देण्यात आले.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला तसेच जनतेचा महासागर याठिकाणी उसळला होता.!


