तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्यावतीने गावोगावी सभा घेऊन देण्यात येत आहेत बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे धडे या मोहीम अंतर्गत कोपरआली मुख्यालय अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना गावोगावी सभा घेऊन बीज प्रक्रिया करण्याचे फायदे तसेच उगवण क्षमता चाचणी करण्याची आवश्यकता तसेच खरीप हंगाम पूर्व शेतीची मशागत आणि बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी मोजा अंबेला तसेच कोळसापुर येथे शेतकरी सभा घेऊन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री कांबळे यांनी शेतकऱ्यांना विविध प्रक्रिया व पट्टा पद्धत भात लागवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी कृषी सहाय्यक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली व खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर करावयाच्या सर्व मशागती बाबत शेतकऱ्यांना जनजागृती केली यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते त्यांनी कृषी विभागाद्वारे सुचवलेल्या सर्व उपायोजना करण्याचे आश्वासन दिले
