मुलचेरा:-
रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने नियमावली बनवली आहे. त्या नियमांचे तुम्ही पालन न केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होणार आहे. जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांसाठी आता सरकारने रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्ड साठी अपात्र ठरलेले आहेत. अशा लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. यासाठी शासनाकडून यादी देखील पाठवण्यात आलेले आहे व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरवठा विभागाकडे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
*यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद*
– जे लोक सरकला आयकर भरत आहेत, अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
– शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.
– ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
– रेशन कार्डशी आधार लिंक केले नसेल तरी देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
शासनाने या बाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली आहे. या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जर तुम्ही अन्य कारणामुळे आयकर भरत असल्यास अपात्र ठरत असाल तर शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनचा लाभ 27 रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. या मध्ये धान्याच्या किमतीची वसुली केली जाणार आहे.