गडचिरोली दि.7: जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रांसाठी 37 ग्रामसेवक व 7 अंगणवाडी पर्यवेक्षक असे 44 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी च्या शासन आदेशानुसार शनिवार व रविवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात तातडीने उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली व आज नियुक्तीपत्रही देण्यात आले.
