ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय

आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय लग्न केल्यामुळे कुटुंबीयांकडून या जोडप्यांचा स्वीकार केला जात नाही त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होता. अशा जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
 महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी व सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
 आवश्यक खर्च सामाजिक न्याय विभाग उचलणार आहे. सेवेसाठी हेल्पलाइन क्रमांक 112 सुरू करण्यात आले असून, या कक्षांद्वारे प्राप्त होणारी माहिती गोपनीय राखली जाईल.
 या निर्णयामुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जीवनाच्या सुरक्षेसाठी आधार मिळेल. त्यांना सामाजिक आणि कुटुंबीयांच्या विरोधास सामोरे जाण्याची भीती कमी होईल.
 राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अशा जोडप्यांना नवा आत्मविश्वास मिळेल, तसेच समाजात सुरक्षितपणे जीवन व्यतीत करू शकतील