ई – पेपर क्रीडा गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपलं करीयर बनवावे-माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम

भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!!

स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात.

या फूटबॉल स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते, अध्यक्षीय भाषणात बोलताना ते म्हणाले फूटबॉल खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या गावाचं आपल्या जिल्हाचं व आपल्या देशाचे नाव उंचावर नेऊ शकतो आपल्या क्षेत्रातील युवकांनमध्ये खेळांच्या बाबतीत खुप गुणवत्ता आहे. काही खेळाळूनी तर आपल्या क्षेत्राचं नाव देश-विदेशात बनवले आहे मी आजपर्यंत आपल्या क्षेत्रातील युवा वर्गाला क्रिकेट, फुटबॉल, कब्बडी, मॅरोथॉन अशा अनेक खेळासाठी प्रोत्साहन देत असतो माझ्याकडून सहकार्य करत असतो, युवकांनी गाव पातळी पर्यंत मर्यादित न राहता, क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावं आणि आपलं करीयर बनवावे असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी युवकांना केलं, पुढे बोलताना ते म्हणाले मी आपल्या सोबत आहो माझ्या कडून मी सर्वोतोपरी सहकार्य करत राहीन असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आणि कार्यकर्ते यांच्या आग्रह खातीर त्यांच्या घरी भेट देऊन

अल्पोपहार घेत कार्यकर्ते यांचा आनंद द्विगुणीत केला.
फुटबॉल स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व उपविजेता स्पर्धकांना माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम बक्षीस- 25000/- देवनगर टीम विजेत्याने पटकाविला. तर द्वितीय बक्षीस-15000/- भवानीपुरच्या विजेत्याने पटकविला होता.
यावेळी अहेरी इस्टेट चे राजकुमार अवधेशबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष गणपती, जिल्हा सचिव बादल शाह, अहेरी तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुंद्री, मूलचेरा तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, महामंत्री निखिल हलदार,युवा मोर्चा अध्यक्ष संजीव सरकार, नगरसेवक दिलीप आत्राम,किशोर मल्लिक, गणेश गारघाटे,अक्षय चुधरी, गुलशन मलेमपल्ली,पवन आत्राम,उत्तम शर्मा तसेच भवानीपुर येथील गावकरी आणि फूटबॉल खेळाळू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…!!