नागरिक अनभिज्ञ: तीन हजार रुपये साहित्य-उपकरणे खरेदीसाठी
मुलचेरा:-वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने तसेच उपकरणे खरेदी करावी लागतात. तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास मदत
व्हावी यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून अर्थसाहाय्य प्राप्त होणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक आपल्या आरोग्यविषयक विविध गरजा पूर्ण करू शकतील.
मुख्यमंत्री 4 वयोश्री योजना
कोण आहे पात्र ? महाराष्ट्रातील रहिवासी व वयाची ६५ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असावे. अर्जदाराकडे आधारकार्ड असावे किंवा आधार नोंदणी पाव असावी. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड असावे.
*काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना?*
महाराष्ट्रातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगता यावे यासाठी ही योजना अर्थसाहाय्याच्या स्वरुपात राबवली जात आहे. वयोमर्यादेमुळे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपक्रम खरेदी करण्याकरिता ही योजना साहाय्य ठरणार आहे.’
“काय लाभ मिळतो?*
वयोश्री योजनेंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना ३ हजार रुपये साधने खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत. या साधनांमध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्च, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर आदी साहित्यांचा समावेश आहे.
अर्ज कोठे करायचा? वयोश्री योजनेच्या लाभासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली येथे अर्ज सादर करावेत, असे कळविले आहे.
*कागदपत्रे काय लागतात?*
योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड / मतदानकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट’ आकाराचे दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.