गडचिरोली,(जिमाका),दि.28: जिल्ह्यात दिनांक 02 डिसेंबर ते 08 डिसेंबर 2024 या कालावधीत पी.एल.जी.ए. नक्षल सप्ताहाचे आयोजन तसेच दिनांक 06 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर […]
Month: December 2024
एकलव्य निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता स्पर्धा परिक्षा प्रवेश अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ जानेवारी २०२५
गडचिरोली,(जिमाका),दि.२८: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वीत एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कूल मधील इयत्ता ६ वीचे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता ७ ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हापरीषद, नगरपालिका, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक […]
सरकारचा मोठा निर्णय! पॅन कार्डमध्ये होणार बदल; आता QR कोडवर मिळणार सर्व माहिती.!
केंद्र सरकारने पॅन कार्डबाबत एक निर्णय घेतला आहे. पॅन कार्डवर आता क्यूआर कोड देण्यात आहे. त्यामुळे सर्व माहिती एका क्लिक वर मिळणार आहे. केंद्र सरकारने सोमवारी PAN 2.O प्रोजेक्ट साठी मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने 1435 रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना अपडेटेड पॅन कार्ड मिळणार आहे.
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात थंडीचा यलो अलर्ट
राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत याच धर्तीवर थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं हा यलो अलर्ट लागू राहणार असून, उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या […]
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर […]
जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन
गडचिरोली,(जिमाका),दि.27:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, नेहरु युवा केंद्र व एन.एस.एस., गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात येत आहे. सन 2024-25 या सत्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली मुख्यालयीन जिल्हास्तर युवा महोत्सवाचे व्यापक स्वरुपात व अधिका अधिक युवकांचा सदर महोत्सवामध्ये सहभाग असावा व […]
विधानसभा निवडणुकीतील 40 लाखांची
निवडणुकीच्या कालावधीत 50 हजार रुपयांवर रोख रक्कम बाळगण्यावर निर्बंध असताना अनेकांकडे त्यापेक्षा जास्त रक्कम आढळली होती. तपासणीत जिल्ह्यात 22 प्रकरणात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम आढळून आली होती. कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यातील 21 प्रकरणांतील रोख रक्कम परत करण्यात आली तर एका प्रकरणात सुनावणी व्हायची आहे. आचारसंहितेच्या कालावधीत 50 हजारांच्या वर रोख रक्कम बाळगण्यास बंदी होती. प्रशासनाच्या […]
पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा
नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ऑनलाईन […]
वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन […]
‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील […]