आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास […]
Day: September 17, 2025
विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.